ABOUT sirf

स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फौन्डेशन(SIRF), सोलापूर

         स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फौन्डेशन(SIRF), सोलापूर ही  प्रयोगशील शिक्षकांनी एकत्रित येऊन इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मँनेजमेंट, अहमदाबाद (IIM AHMEDABAD) यांच्या सहकार्याने सुरु केलेली संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम करणारे शिक्षक या संस्थेचे सदस्य आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सुमारे 30,000 हून अधिक शिक्षक या संस्थेशी जोडले गेले आहेत.


 या संस्थेमार्फत घेण्यात आलेले विविध उपक्रम:-

 प्रयोगशील शिक्षकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद.
 सर्जनशील शिक्षक – वृत्तपत्र लेखमाला.
 सर्जनशील शिक्षण लेखांचे प्रदर्शन.
 शिक्षकांसाठी नवोपक्रम कार्यशाळा.
 शिक्षक आणि डी .एड विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन.
 शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन, शिक्षकांसाठी अभ्यासदौरा.
 इनोव्हेटिव टीचर्स अवार्ड्स.
 विडी कामगारांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांसाठी कार्यशाळा.
 राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशनल इनोव्हेशन कार्यशाळा.
               तसेच नवोपक्रम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन आदी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

● संपर्क:– सिद्धाराम माशाळे / बाळासाहेब वाघ.
स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फौन्डेशन (SIRF), सोलापूर
१३०, धनश्री नगर, सदिच्छा सोसायटी जवळ, विजापूर रोड, सोलापूर, ४१३००४
फोन नंबर – ९९७०१९१८१४, ९९२२९९४४२९
           sirfoundationmh@gmail.com

No comments:

SIRF State level Innovation Compitition 2018 Posters