Sunday, 19 February 2017

StateLevel Board Writing Competition 2017


'सर फाउंडेशन, महाराष्ट्र' आणि ‘माझी शाळा, माझा फळा’(व्हाटसअप ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने

सर फाउंडेशन, महाराष्ट्र च्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त
आयोजित करण्यात आली आहे.



 सर फाउंडेशन, महाराष्ट्र ही संस्था गेल्या ११ वर्षापासून राज्यातील नवोपक्रमशील, कृतीशील, सर्जनशील शिक्षकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे, त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा देणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. शिक्षणात सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण व संशोधनात्मक कार्यास प्रोत्साहन देणे. विविध प्रकारचे शैक्षणिक प्रयोग तयार करणे. प्रयोगशील शिक्षकांचे ‘नेटवर्क’ तयार करणे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करणे. विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात सहभागी होणे आदी कार्य सर फाउंडेशन करीत आहे. १९ फेब्रुवारी २००६ रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

• स्पर्धेचे विषय •
१)सर फाउंडेशन वर्धापन दिन
२)प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र


• स्पर्धेचे नियम •
* या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्रातील असणे आवश्यक आहे. * वरीलपैकी एकाच विषयावर फलक लेखन असावे. * फलकलेखनात उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात आपले संपूर्ण नाव, शाळेचे नाव, जिल्हा आणि आपला मोबाईल क्रमांक यांचा उल्लेख करावा. * हे फलकलेखन आपण कोणत्याही व्हाटसअप ग्रुप अथवा फेसबुक वर शेअर केलेले नसावे किंवा करू नये. * हे फलकलेखन खाली दिलेल्या ईमेल वरच पाठवावे. * हे फलक लेखन पाठवण्याची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी २०१७ ही आहे. * अंतिम निर्णय परीक्षण समितीच्या आधीन असेल. 


सर फाउंडेशनच्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी Log On करा.


• स्पर्धेचे पारितोषिक • 
 रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र


• फलकलेखन या ईमेल वर पाठवावे •
sirfoundationmh@gmail.com


• स्पर्धेचे परीक्षक •
श्री अमित भोरकडे (मो. ७५८८५०४८५२),
श्री राजकिरण चव्हाण (मो. ९८८१०९२१५१)


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
फलकलेखन करण्यासाठी मागर्दर्शक बाबीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://www.amitbhorkade.com/gallery.html
http://srujanshilshikshak.blogspot.in/p/blog-page_25.html

No comments:

SIRF State level Innovation Compitition 2018 Posters